गणेशोत्सव
Chinchpokli Cha Chintamani · Since 1920

आगमन सोहळा
श्री चिंतामणीचा पाटपूजन सोहळा मंगलमय वातावरणात शनिवार दि. १५ जुलै २०२३ रोजी चिंतामणी सभामंडपात पार पडला. त्यानंतर श्री चिंतामणीचा आगमन सोहळा ढोल ताशांच्या गजरात व भक्तिमय वातावरणात शनिवार दि. ९ सप्टेंबर २०२३ रोजी संपन्न झाला.
प्रतिष्ठापना
मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल सुभद्रा अर्जुन आजगांवकर यांच्या हस्ते व श्री दत्तात्रय शास्त्री यांच्या पौराहित्याखाली श्री चिंतामणीची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिवर्षाप्रमाणे श्री महाभिषेक व श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात येऊन पूजेचा प्रसाद घरोघरी देण्यात आला.
सजावट व व्यवस्था
मूर्तिकार स्व. विजय खातू यांची कन्या रेश्मा खातू यांनी सुबक मूर्ती घडविली. नेत्रदीपक सजावट श्री राहुल परब, वेशभूषा श्री प्रकाश लहाने व प्रकाश योजना श्री विशाल शेलार यांनी केली.
मंडप-दिवाबत्ती श्री चंद्रकांत बापते, छपाई सौ संगीता कडव व बॅनर श्री प्रदिप राणे यांनी केले. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी प्रथमच रेलिंग सहित पूल श्री सुनील चाळके यांनी उभारला.
छायाचित्रण व मान्यवर भेट
श्री अवधूत हेमबार्डे यांच्या सौजन्याने श्री चिंतामणीचे फोटो सेशन पार पडले. उत्सव कालावधीत छायाचित्रकार म्हणून श्री अमर जाधव यांनी काम पहिले. गणेशोत्सवाच्या कालावधीत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन मंडळाच्या कार्याची प्रशंसा केली.
सेवा उपक्रम व विसर्जन
श्री नूतन बाबदेव मित्र मंडळाकडून रोज सायंकाळी आरतीची सेवा रुजू करण्यात आली. मंडळाच्या वतीने प्रथमच आयडियल एंटरप्रायजेस च्या सहकार्याने प्रसाद विक्री व पथनाट्यांचे आयोजन केले. अनंत चतुर्दशीस गिरगाव चौपाटीवर जड अंतःकरणाने श्री गणरायाला निरोप देण्यात आला.
